HSC Board Form 2025 – इयत्ता बारावी फिरवी मार्च 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2024 आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-४
प्रकटन
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखा
सर्व संबंधित महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती:
शास्त्र, कला, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रमातील नियमित विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षार्थी यांचे परीक्षा आवेदनपत्रे SARAL DATABASE द्वारे भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
महत्वाच्या तारखा:
विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र सादर करण्याची तारीख:
मंगळवार, दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४
ते
बुधवार,दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत
प्रत्येक महाविद्यालयाने परीक्षा शुल्क RTGS/NEFT द्वारे भरावे:
महत्वाचे निर्देश:
1. SARAL DATABASE मधील विद्यार्थ्यांची माहिती अचूक भरावी.
2. सर्व विद्यार्थ्यांचे नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) वेळेत प्राप्त करून घ्यावे.
3. श्रेणीसुधार विद्यार्थी किंवा तांत्रिक प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी देखील आपली माहिती वेळेत भरावीत.
4. महाविद्यालयांनी आपल्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली Pre-List तपासून घ्यावी.
सर्व महाविद्यालयांना विनंती आहे की त्यांनी आपले आवेदनपत्रे वेळेत सादर करून, कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये याची खबरदारी घ्यावी.
टीप: RTGS/NEFT पावत्या संबंधित तारखांमध्ये सादर कराव्यात.
अधिकृत वेबसाईट – https://mahahsscboard.in
PDF Advertise – तेथे पाहा