फेब्रुवारी – मार्च 2025 होणाऱ्या 12 वी परीक्षेचे Hall Ticket दिनांक 10/01/2025 पासून उपलब्ध.
HSC Hall Ticket 2025
विषय: फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत
सर्व मुख्याध्यापक/प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना कळविण्यात येते की,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अंतर्गत असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा साठी ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
आपण सर्व जण खालील महत्वपूर्ण बाबींची नोंद घेऊन त्या नुसार योग्य कार्यवाही करावी:
१. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची माहिती:
- सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवार, १०/०१/२०२५ पासून डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध होईल.
२. शुल्क व इतर मार्गदर्शन:
- ऑनलाईन प्रवेशपत्र प्रिंट करतांना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाऊ नये.
- प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक/प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
३. प्रवेशपत्र संबंधित तांत्रिक दुरुस्त्या:
- विद्यार्थ्यांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख इत्यादी माहितीमध्ये कोणतीही चूक असल्यास, Online Application Correction लिंक वापरून दुरुस्त्या करता येतील.
४. विलंब शुल्क:
- ज्या विद्यार्थ्यांचे “Paid” Status अद्याप अपडेट झाले नाहीत, त्यांचे प्रवेशपत्र “Late Paid Status” ऑप्शनद्वारे डाउनलोड करू शकता.
५. फोटो संबंधित दुरुस्ती:
- विद्यार्थ्यांचा फोटो सदोष असल्यास, योग्य फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का करावा.
६. गहाळ प्रवेशपत्र:
- गहाळ झालेल्या प्रवेशपत्रासाठी शाळेने Duplicate प्रवेशपत्र प्रिंट करावे व त्यावर लाल शाईने “Duplicate” असा शेरा देऊन विद्यार्थीला प्रदान करावे.
महत्वाची सूचना:
सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक/प्राचार्य आणि शाळा/महाविद्यालये या सूचनांचे पालन करून परीक्षेसाठी सर्व आवश्यक तयारी कराव्यात.
नोट: प्रवेशपत्र संबंधित तांत्रिक अडचणी असल्यास विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
Website – https://www.mahahsscboard.in
नोटीस – येथे Download करा
अधिक माहितीसाठी संपर्क करा –